मूल : कर्कश आवाजात आणि भरधाव वेगात वाहण चालविणा-या चालकांविरूध्द मूल पोलीसांनी मोहीम हाती घेतल्याने कर्कश आवाजात वाहण चालवुन नियमांचे उल्लंघन करणारे चांगलेच धास्तावले आहे.
पोलीस स्टेशन मूल येथे सुमीत परतेकी ठाणेदार म्हणून रूजू होवून महिणाही पुर्ण झालेला नाही. तोच ठाणेदार परतेकी यांनी सहका-यांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. शांत आणि संयमी तालुका म्हणून ओडखल्या जाणा-या मूल तालुक्याची ओडख कायम राहावी, कोणत्याही कारणांवरून तालुक्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडू नये गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढू नये यासाठी ठाणेदार परतेकी परिस्थितीवर लक्ष ठेवून असतांना मागील काही दिवसांपासून येथील काही युवक शहराच्या मुख्य मार्गावरून कर्कश आवाजात भरधाव वेगात वाहण चालवित असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्या युवकांची ही कृती नियमबाहय, ध्वनी प्रदुषण करणारी आणि जीवघेणी ठरू शकते. याची नोंद घेवून स्थानिक गांधी चौकात नाकाबंदी करून कर्कश आवाजात वाहण चालवितांना राम करकाडे याला ताब्यात घेतले. घटनेच्या वेळेस राम करकाडे हा एमएच ३४ एडी ७८६७ क्रमांकाच्या बुलेटच्या सायलन्सर मध्यें बदल करून फटाके फोडल्या सारखे कर्कश आवाजात वाहन चालवितांना आढळुन आला. नियमाचे उल्लंघन करून दुचाकी वाहण चालविल्याचे कारणावरून ठाणेदार परतेकी यांनी राम करकाडे विरूध्द कारवाई केली आहे. यापुढील काळात शहर आणि तालुक्यात कर्कश आवाज आणि भरधाव वेगात वाहण चालवितांना किंवा अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी वाहण चालवितांना आढळल्यास त्याचे सोबतचं त्याच्या पालकाविरूध्द मोटार वाहन कायदयानुसार कारवाई करण्यात येईल. असे सुचवतांना पालक आणि वाहण मालकांनी मोटार वाहन कायदयाचे पालन करून सहकार्य करावे. असे आवाहन ठाणेदार परतेकी यांनी केले आहे. ठाणेदार पदावर रूजू झाल्यापासून ठाणेदार सुमीत परतेकी यांनी साध्या गणवेशात शहराचा अभ्यास करीत असून अनुचित प्रकारावर त्यांचे सातत्याने लक्ष आहे. त्यामूळे सध्यास्थितीत शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधीत असल्याचे दिसून येत असले तरी राञोच्या वेळेस बस स्थानक, जुने रेल्वे स्टेशन, नवीन रेल्वे स्टेशन, कर्मवीर महाविद्यालयाचे पटांगणाच्या परीसरावर जातीने लक्ष ठेवावे. अशी नागरीकांची अपेक्षा आहे.












