मूल : तेली समाजाच्या वतीने डोंगरगांव येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ तेली समाजाचे चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सूर्यकांत खंके हे होते .तसेच प्रमुख अतिथी म्हणून चिमूर तालुक्याचे अध्यक्ष धनराज मुंगले, जिल्हा महासचिव गंगाधर कुनघाडकर, जिल्हा संघटक कैलास चलाख, सरपंच शिल्पा भोयर, माजी उपसभापती गजानन वलकेवार आदी उपस्थित होते. त्यांनी बोलताना महाराष्ट्राला संताची मोठी परंपरा लाभली असून त्यांनी सामाजिक सुधारणेचे कार्य केले. जगनाडे महाराज यांनी आयुष्यभर सामाजिक चळवळ उभारण्यासाठी योगदान दिले. असे सांगितले. त्या अगोदर तेली समाजाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. डोंगरगावचे अध्यक्ष वामन टिकले , सचिव गणेश टिकले, शालीक वासेकर, राजीव बोबाटे, स्वप्निल टिकले, हरिदास चिरके , प्रवीण पिपरे व महिला अध्यक्ष उषा टिकले यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन केले. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी गीत व आपापली भाषण सादर केले. त्यांचे कौतुक करण्यात आले .कार्यक्रमाचे संचालन कमलेश वासेकर यांनी केले कार्यक्रमास गावातील सर्व समाज बांधव व मान्यवर उपस्थित होते.












