मूल – पक्षी सप्ताहा निमीत्त्य स्थानिक संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांनी सावली वनपरिक्षेत्रातील राजोली येथील जंगल तलावाच्या परीसरात विविध प्रजातीच्या पक्षांचे निरीक्षण करून त्यांच्या नोंदी घेतल्या. नोंदी दरम्यान अनेक वेगवेगळ्या रंग व प्रजातीच्या पक्षाचे दर्शन झाले. या प्रसंगी संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशासिंह झिरे, मनोज रणदिवे, प्रशांत केदार, प्रभाकर धोटे, अंकुश वाणी, रितेश पिजदुरकर, नागेश कंकलवार, शेखर जेंगठे, निलेश उईनवार उपस्थित होते..












