*माळी समाज बांधवांतर्फे गुरु गुरनुले यांचा सत्कार*. मुल – माळी महासंघाचे विभागीय महासचिव, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार क्रांती ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व मुल नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री. गुरु गुरनुले यांची मुल तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माळी महासंघाचे तसेच समाजाच्या विविध संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी यांचे तर्फे शाल श्रीफळ पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. रामभाऊ महाडोळे ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील वाढई, माजी प्राचार्य बंडूभाऊ गुरनुले, महाराष्ट्र राज्य काँग्रेस ओबीसी सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंदू चटारे, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.पद्माकर लेंनगुरे , माळी महासंघाचे जिल्हा महासचिव राकेश ठाकरे, युवक पदाधिकारी सौरभ वाढई, प्रमोद निकुरे, प्रकाश शेंडे, रामदास गुरनुले, यांचेसह माळी बांधव उपस्थित होते. माझा सत्कार हा माझा नसून संपूर्ण माळी समाज बंधवांचा सत्कार असल्याचे मत नवनिर्वाचित काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी व्यक्त केले आणि सर्वांचे आभार मानले.












