आश्लेषा आष्टनकर रेखाटते मनमोहक रांगोळी
कला क्षेत्रात विशेष आवड
मूल :- येथील कु. आश्लेषा आष्टनकर अतिशय मनमोहक रांगोळी रेखाटते. आश्लेषा ही भाजपाचे शहर सरचिटणीस चंद्रकांत आष्टनकर यांची मूलगी आहे. मूल येथील सेंट अॅनेस हायस्कूलची वर्ग दहावीची ती विदयार्थीनी आहे. आश्लेषाला अभ्यासाबरोबर चित्रकलेत मोठी आवड आहे. कला हा तिचा विशेष आवडीचा विषय आहे. त्यामुळे यात ती वेगवेगळे छंद जोपासत असते. दिवाळीच्या आनंददायी पर्वात तिने मनमोहक आणि आकर्षक रांगोळी रेखाटून सगळयांचे लक्ष वेधून घेतले. सुबक अशा रांगोळी काढण्यात तिचा हातखंड आहे. रंगसंगतीचा मेळ जुळवून त्यात ती आकर्षक रंग सुदधा भरते. वयाच्या दहाव्या वर्षापासून तीला कलेची आवड आहे.आत्तापर्यंत आश्लेषाने सुबक रांगोळया रेखाटल्या आहेत. ती चित्रकलेची एलिमेंटरी परीक्षा पास असून इंटरमिजीएट परीक्षा नुकतीच दिली आहे. आई वडील आणि आजी कडून तीला सदैव कलेच्या बाबतीत प्रेरणा मिळत असते. कलेच्या क्षेत्रात पुढे करीअर करावयाचे असल्याचे मत आश्लेषाने मूल टुडेशी बोलताना व्यक्त केले.












