मुल : तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्ण खरीप पीक उद्ध्वस्त झाले आहे. मुल तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविम्याचे हप्ते भरले आहेत. पण अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. अशा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यांच्या निर्देशांनव्ये चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे सूचनेनुसार काँग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे मार्गदर्शनाखाली मुल तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात पीक विमा मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. करीता मुल तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, पण त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांनी आपले नाव, मोबाइल क्रमांक व पीकविमा भरल्याची पावती ( झेरॉक्स) ही कागदपत्रे मुल तालुका काँग्रेस कमिटीचे जनसंपर्क कार्यालय गांधी चौक मुल येथे तालुका अध्यक्ष गुरुभाऊ गुरनुले व शहर अध्यक्ष सुनील शेरकी, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार (बेंबाळ) यांचेकडे दिनांक ३ डिसेंबर २०२२ पर्यंत जमा करावे असे आवाहन मुल तालुका, ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीने केले आहे.












