मूल : मराठी विषयाच्या पाठयपुस्तकातील बालसभा हया पाठाचे थेट बालसभेत रूपांतर करून विद्याथ्र्यांना सभा कशी आयोजीत करायची. याचे प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करण्याचा नवा उपक्रम स्थानिक नवभारत कन्या विद्यालयात सादर झाल्याने विद्याथ्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे. स्थानिक नवभारत कन्या विद्यालयाच्या शिक्षीका मंजुषा अशोक येरमे (पंधरे) यांनी इयत्ता सहावीच्या विद्याथ्र्यांना बालसभा हा पाठ शिकवतांना त्यांनी वर्गखोलीत प्रत्यक्ष बालसभाच सादर केली. इयत्ता दहावी मध्यें शिकणारी आशा बावनवाडे हया विद्यार्थीनीस सभेचे अध्यक्षस्थान दिले तर वर्ग सातवीची अक्षरा गुलभमवार आणि वर्ग सहावीची रिया झाडे यांना प्रमुख अतिथी म्हणून मंचावर विराजमान करण्यांत आले. त्यानंतर सभेच्या संचालनापासून प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन कश्या प्रकारे मानले पाहिजे, याबाबत विद्याथ्र्यांना पुर्वप्रशिक्षण देवून मंजुषा येरमे यांनी बालसभेला प्रारंभ केला. सभेच्या प्रारंभी मंचावरील मान्यवर विद्याथ्र्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. विद्यार्थीनी सेजल मारकवार ही प्रास्ताविक केले तर श्रेया श्रीरामे, ईश्वरी आंबटकर, रिया झाडे आणि अक्षरा गुलभमवार यांनी बालसभेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतीबा फुले यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकला. आशा बावनवाडे हीच्या अध्यक्षीय मनोगताने बालसभेची सांगता झाली. सभेचे स सुत्रसंचालन रूचीता लेनगुरे हीने तर आबा आंबटकर हीने आभार प्रदर्शन केले. बालसभेचे मुल्यांकन विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर पुराम, शिक्षक प्रफुल निमगडे, धिरज धोडरे, अर्चना बेलसरे, उज्वला चहांदे आणि तृप्ती रामटेके यांनी केले. बालसभा पाठाचे प्रात्याक्षीकासह सादरीकरण झाल्यानंतर पर्यवेक्षक पुराम यांनी बालसभा पाठाचे सादरीकरण विद्यार्थीनींना उत्तम मार्गदर्शक आणि संचालनकर्ती बनण्यास महत्वाचे ठरू शकते. असे मत व्यक्त केले. बालसभा पाठाचे प्रत्यक्ष सादरीकरणासह अध्यापन केल्याने विद्यार्थीनींनी शिक्षीका मंजुषा येरमे यांचे प्रती आभार व्यक्त करून समाधान मानले.












