मूल : स्थानिक माजी सैनिक संघटना आणि भरारी माजी सैनिक महीला बचत गटाच्या विद्यमाने दिपावलीच्या शुभ पर्वावर माजी सैनिक वसाहतीमध्ये एक दिया शहीदो के नाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमात उपस्थित माजी सैनिक आणि माजी सैनिक भरारी बचत गटाच्या उपस्थित सदस्यांनी भारताच्या संरक्षणासाठी देहाची आहुती दिलेल्या सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ दिवा लावुन श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडेकर आणि माजी सैनिक भरारी महीला बचत गटाच्या अध्यक्षा अंजली सुर यांचेसह मारोती कोकाटे, लक्ष्मण निकुरे, सहदेव रामटेके, मारोती कुळमेथे, विजय भसारकर, पुरूषोत्तम चलाख, प्रशांत पाटील, बाबा सुर, सुरेंद्र नामपल्लीवार, बाबु शेख, गजेंद्र प्रधान, संतोष खोब्रागडे आणि किसन खोब्रागडे, कवीता मोहुर्ले, पुष्पलता जंबुलवार, कवीता गाडेकर, करूणा खोब्रागडे, सुनिता खोब्रागडे, वंदना निकुरे आणि रेखा रामटेके उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.












