मूल : अंतःकरणातून विश्वास ठेवतो तोच जीवनात नितीमान ठरतो हे सत्य डोळयासमोर ठेवून प्रत्येक व्यक्तीने परमेश्वरावर विश्वास ठेवल्यास परमेश्वर पाप आणि अपराधामधून क्षमा करून सामर्थ्यवान व्यक्ती होण्यास प्रेरणा देतो. असे मत भविष्यवक्ता पास्टर रेव्ह. संदिप गायकवाड यांनी व्यक्त केले.
आशिर्वाद सेवा संगती ट्रस्ट मूलच्या वतीने स्थानिक भाग्यरेखा सभागृह येथे आयोजीत तीन दिवसीय शिबिरात ते बोलत होते. बायबल हा देवाच्या प्रेरणेनी लिहीलेला अभिजात वाचनीय साहित्य ग्रंथ असून यामध्यें ईश्वराच्या प्रेमाची व मणुष्याच्या श्रध्देची कथा आहे. बायबल वाचनामधून मणुष्याच्या अंतःकरणातील नकारात्मक भावना नष्ट होवून सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. त्यामूळे प्रत्येकाने बायबल ग्रंथाचे वाचन करावे. अशी विनंती यावेळी रेव्ह. संदीप गायकवाड यांनी केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस पार्टीचे महासचिव तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, सामाजीक कार्यकर्ते नितीन गद्देवार, संदीप मोहबे आदि उपस्थित होते. यावेळी संतोषसिंह रावत आणि राकेश रत्नावार यांनी मनोगत व्यक्त केले. परमेश्वर एकच असून तो विविध स्वरूपात वेगवेगळया नांवाने अदृष्य आहे. परमेश्वराप्रती विश्वास आणि श्रध्दा बाळगल्यास तो सदैव नैराश्यामधून मार्ग दाखवतो, असे मत काॅंग्रेस नेते संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले. सभा उत्सवाचे अध्यक्ष तथा आयोजक रेव्ह. सुरेश शेंडे यांनी प्रास्ताविक आणि कार्यक्रमाचे संचलन केले. तीन दिवसीय आशिर्वाद उत्सवात नागपूर येथील रेव्ह. नवनीत साळवे आणि रेव्ह. जेफीन वर्गीस यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता पास्टर सुरेखा शेंडे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. तीन दिवसीय उत्सवात चंद्रपूर, गडचिरोली जिल्हयातील वेगवेगळया गावांमधून शेकडो आबाल स्त्री पुरूष आणि युवक सहभागी झाले होते.












