मूल : निसर्गाचे वरदान प्राप्त असलेली बुध्दटेकडी बौध्द धर्मीयांचे श्रध्दास्थान झाले असुन याठिकाणी भगवान गौतम बुध्दाचे स्मारक निर्माण करण्यासाठी समाजाने पुढाकार घेतल्यास सहकार्य करण्याची तयारी आहे. असे मत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले.
श्रध्देय भदन्त संघवंस थेरो यांच्या १९ व्या वर्षावास समाप्ती निमित्य स्थानिक बुध्दटेकडी येथे आयोजित कठीण चिवरदान सोहळ्यात संतोषसिंह रावत बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश भिख्खुसंघाचे महासचिव भदन्त सुमनवण्णो महाथेरो यांचे मुख्य उपस्थितीत झालेल्या सोहळ्याला बल्लारपुर येथील भदन्त आनंद थेरो, भिख्खु सुजान तिरस, भिख्खु धम्मप्रकाश संबोधी, आयोजक केसीन खोब्रागडे, संतोष खोब्रागडे, राजेश थुल आणि अक्षय गोवर्धन उपस्थित होते. बौध्द धर्माचा प्रसार करण्यासाठी बुध्दटेकडी येथे वास्तव्याने असलेले भदन्त संघवंस थेरो यांच्या निवासा करीता संतोषसिंह रावत यांनी स्वखर्चाने निवास व्यवस्था करून दिल्याबद्दल उपस्थित भदन्त सुनवण्णो महाथेरो यांचे हस्ते रावत यांचा शाल पुष्गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. भदन्त सुमनवण्णो महाथेरो यांनी भदन्त संघवंस थेरो यांच्या आज पर्यंतच्या वास्तव्याच्या काळात त्यांना आलेले वन्यप्राण्यांचे व इतरही अनुभव सांगतांना जीव संकटात टाकुन बौध्द धर्माचा प्रचार करणाऱ्या भदन्त संघवंस यांच्या जीवीताच्या रक्षणासोबतच धर्माच्या प्रचार करण्यासाठी संतोषसिंह रावत मदतीला धावुन आले. त्याबद्दल भिख्खुसंघाचे वतीने सुमनवण्णो महाथेरो यांनी रावत यांचेकडुन धार्मिक विधी करवुन घेत आभार मानले. सत्कारा दाखल मनोगत व्यक्त करतांना संतोषसिंह रावत यांनी भिख्खुकुटीच्या निर्मिती मागची भुमीका विषद केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले, शहराध्यक्ष सुनिल शेरकी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन निलमवार, प्रशांत उराडे, संदीप मोहबे, सुरेश फुलझेले, आकाश दहीवले, सौरभ हसन वाढई, डेव्हीड खोब्रागडे, यादव रामटेके, विनोद निमगडे, सुजीत खोब्रागडे, लिना फुलझेले, सुशीला खोब्रागडे, माया पुणेकर, आदी उपस्थित होते.












