मूल : मार्गाच्या कडेला उभे असलेल्या दोन वाघांनी दुचाकीस्वारांवर जीवघेणा हल्ला करताच पत्नी आणि मुलासह दुचाकीस्वार मार्गावर पडले. मात्र त्याचक्षणी संतोष रावत यांचे वाहण देवदुतासारखे घटनास्थळी पोहोचले. त्यामूळे मार्गावर पडलेल्या व्यक्तींना सोडून वाघ जंगलात पळाले. अन्यथा त्यांचा नाहक बळी गेला असता. सदर घटना आज सकाळी मूल चंद्रपूर मार्गावर घडली. सकाळी 11 वाजताचे दरम्यान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष तथा काॅंग्रेसचे प्रदेश महासचिव संतोषसिंह रावत खाजगी वाहणाने चंद्रपूरला जात असतांना त्यांचे वाहणासमोर दुचाकीस्वार महिलेला घेवून जात होते. दरम्यान आगडी आणि केसलाघाट दरम्यान झुडपात दबा धरून बसलेले दोन वाघ त्यांचे दुचाकीवर धावून आले. त्याचक्षणी दुचाकीस्वारासह महिला आणि लहान मुलगा मार्गावर पडले. दोन्ही वाघ त्यांचेवर हल्ला करणार तोच त्यांच्या पाठीमागे अगदी 50 ते 60 फुटावर असलेले संतोषसिंह रावत यांचे वाहन हार्न वाजवत घटनास्थळी पोहोचल्याने दोन्ही वाघांनी मार्गावर पडलेल्या इसमांना सोडून जंगलात पळून गेले. अन्यथा दुचाकीस्वारांचा नाहक बळी गेला असता. दोन्ही वाघ जंगलात पळून गेल्यानंतर संतोषसिंह रावत यांनी वाहण थांबवून जखमींना स्वतःच्या वाहणांत बसवून चंद्रपूरकडे निघाले. दरम्यान वाघाच्या जीवघेण्या हल्ल्यामधून थोडक्यात बचावलेले दुचाकीस्वार हे महादवाडी येथील कुळमेथे दाम्पत्य असल्याचे समजले. दुचाकीवरून मार्गावर पडल्याने जखमी कुळमेथे दाम्त्पत्य आणि त्याच्या लहान मुलाला महादवाडी येथे त्यांचे घरी सुखरूप पोहोचविले. दरम्यान सदर घटनेची महादवाडी येथे चर्चा होवू लागताच ग्रामस्थांनी रावत यांचे समोर वाघाच्या दहशतीच्या अनेक घटना सांगीतल्या. देवदुता सारखे घटनास्थळी पोहोचले म्हणून कुळमेथे दाम्पत्य घरी सुखरूप पोहोचू शकल्याच्या प्रतिक्रिया महादवाडी वासीयांनी व्यक्त केल्या.
मूल चंद्रपूर महामार्ग ताडोबा-कोळसा अभयारण्याच्या हद्दीला लागुन जातो. त्यामूळे या मार्गावरून जाणाऱ्या अनेकांना वाघांचे दर्शन होत असते. आजची जीवघेणी घटना आपल्या वाहणामूळे टळली. अन्यथा कुळमेथे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामूळे जंगला मधुन गेलेल्या महामार्गाच्या दोन्ही बाजुला संरक्षण कुंपण करून जीवीला संरक्षण द्यावे – संतोषसिंह रावत, महासचिव, प्रदेश काँग्रेस कमेटी












