मूल : श्री माँ दुर्गा मंदीर सेवा समिती मूलच्या वतीने संचलन होत असलेल्या येथील श्री माँ दुर्गा मंदीर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही शारदीय नवराञी महोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. उद्या सकाळी ८.३० वा. मंदीर सेवा समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि ममता रावत यांचे हस्ते विधीवत पुजन करून घट स्थापीत केल्या जाईल. नवराञीच्या दरम्यान दररोज सकाळी आणि संध्याकाळी ७ वाजता श्री माँ दुर्गा देवीची आरती होईल. संध्याकाळी ८ वाजतापासुन राञौ १० वा. पर्यंत गरबा आणि दांडीया नृत्याचे सादरीकरण होईल. दिनांक २९ सप्टेंबर रोजी अष्टमीच्या निमित्ताने दुपारी कन्या पुजन व भोजनाचा धार्मिक विधी पार पडेल. राञौ ८ वा. जय माता दी महीला मंडळाचे वतीने श्री माँ नवदुर्गेच्या नवरूपाचे सादरीकरण होणार आहे. दिनांक ३० सप्टेंबर रोजी नवमीच्या शुभादिनी राञी ८ वा. गरबा दांडीया समुह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गरबा दांडीया समुह नृत्य स्पर्धेत प्रथम येणाऱ्या समुहाला ३१ आणि व्दितीय क्रमांकाला २१ हजाराचे बक्षीस दिल्या जाणार आहे. स्पर्धेत ११ हजार रूपयाचे प्रौत्साहनपर बक्षिस दिल्या जाणार असुन उत्कृष्ठ वेषभुषेला ५ हजार रूपयाचे पारीतोषीक देण्यात येणार आहे. गरबा दांडीया समुह नृत्य स्पर्धेत सहभागी होवु इच्छीणा-यांनी आपल्या समुहाचे नांव संजय पडोळे, गुरू गुरनुले, ममता रावत, सोनाली रत्नावार, ज्योती चटारे किंवा आरती चेपुरवार यांचे कडे नोंदवावी. अशी विनंती आयोजकांनी केली आहे. गरबा दांडीया समुह नृत्य स्पर्धेशिवाय घरगुती गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना त्याच दिवशी समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि अन्य पदाधिका-यांचे हस्ते रोख बक्षीस आणि चषक देवुन सन्मानित करण्यात येणार आहे. विजया दशमीच्या शुभ दिनी श्री माँ दुर्गा देवीला सोने अर्पण केल्यानंतर नवराञी महोत्वसाची सांगता ३ आँक्टोबर रोजी होणार आहे. यावर्षी प्रथमच श्री माँ दुर्गा मंदीर सेवा समितीने नवराञीच्या काळात महोत्सवाला सहकार्य होण्याचे उद्देशाने लक्की ड्रा चे आयोजन केले आहे. केवळ १०० रूपयाच्या एका कुपनवर विविध आकर्षक वस्तु नागरीकांना उपलब्ध होणार आहे. महोत्सवाच्या सांगता दिनी ३ आँक्टोबर रोजी दुपारी १ वाजता लक्की ड्रा चे कुपन उघडण्यात येणार असुन त्याच ठिकाणी वस्तु दिल्या जाणार आहे. दुपारी ४ ते ६ वा.पर्यत स्नेहभोजन आणि संध्याकाळी ६.३० वा. महाआरती नंतर श्री माँ दुर्गा मंदीर येथे स्थापीत श्री घटाची विसर्जन मिरवणुक निघणार आहे. निघणाऱ्या मिरवणुकीत नवदेवीची आकर्षक देखावे सादर करण्यात येणार आहे. आयोजित सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. अशी विनंती. नवराञी महोत्सव आयोजन समितीचे संयोजक राकेश रत्नावार, रूपल रावत, दिपक गोयल, सुनिल मंगर, लोमेश नागापुरे, राजेश रावत, विवेक मुत्यलवार आदींनी केली आहे.












