बस चालकाच्या निष्काळजीपणामूळे महीलेवर शस्ञक्रियेची पाळी, ई-बस गतीरोधकावर उसळल्याची घटना

0
22

मूल : भरधाव वेगात धावणारी ई-बस गतीरोधकावरून उसळल्याने बसने प्रवास करणा-या एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून पाठीमागे बसलेल्या इतरही प्रवाश्यांना शारिरीक त्रास सहन करावा लागला, त्यामूळे सदर बसचालका विरूध्द कारवाई करून नुकसान भरपाई मिळवुन द्यावी. अशी मागणी दुखापतग्रस्त महिलेच्या मुलाने केली आहे. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील रहीवाशी सुमन नामदेव वासेकर (51) काल (10/9/25) दुपारी 11.15 वा. सुमारास खाजगी कामासाठी आपल्या मुलीसोबत मूल बस स्थानकावरून ई बस क्रमांक – 4191 ने चंद्रपूरला जात असतांना चालकाने बस भरधाव वेगात निष्काळजीपणाने चालवली. त्यामूळे इ बस महामार्गावरच्या गतीरोधकावर उंच उसळली. बस भरधाव वेगात धावत असतांना बस गतीरोधकावरून जाताच उंच उसळल्यामूळे बसच्या पाठीमागच्या सिटवर बसलेल्या सुमन नामदेव वासेकर यांचेसह अनेक प्रवासीही सीटवरून उंच उसळले. सिटवरून उंच उसळल्याने सुमन वासेकर यांना पाय आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली. दुखापतीमूळे वेदना असहय होवू लागताच त्यांना त्याच बसने स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात हलवुन बस पुढील प्रवासाला रवाना झाली. प्राथमिक उपचाराअंती सुमन वासेकर यांच्या कंबरेला गंभीर दुखापत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यांत आले. उपचाराअंती डाॅक्टरांनी सुमन वासेकर यांचेवर शस्त्रकिया करणे आवश्यक असुन मोठा खर्च येणार असल्याचे सांगीतले. सुमन वासेकर यांचे कुटूंब गरीब असल्याने सध्या त्या चंद्रपूर येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. शस्त्रक्रियेकरीता आवश्यक असलेली रक्कम नसल्याने शस्त्रकिया कशी करायची ? असा गंभीर प्रश्न त्यांचेसमोर निर्माण झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रवाश्यांच्या जीवाची तमा न बाळगता बस भरधाव वेगात निष्काळजीपणाने चालविल्याने सुमन वासेकर यांचेवर शस्त्रक्रियेचा दुदैवी प्रसंग ओढवला असून इतरही प्रवाश्यांना किरकोळ दुखापती झाल्या. त्यामूळे दुखापतीला जबाबदार असलेल्या बस चालकाविरूध्द कारवाई करून नुकसान भरपाई दयावी. अशी मागणी दुखापतग्रस्त सुमन वासेकर यांचा मुलगा गणेश नामदेव वासेकर यांनी केली असुन वरीष्ठांकडे दाद मागणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here