स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मूल नगर परीषद जिल्हात पहीली, नागरीक आणि कर्मचारी यांचे मानले मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी आभार*

0
29

मूल : देशाला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी देशातील नागरीकांना स्वच्छतेची सवय लागावी आणि त्यामाध्यमातून जनतेचे आरोग्य निरोगी ठेवण्यास प्रौत्साहन मिळावे. या उद्देशाने भारत सरकारचे शहरी व ग्रामीण विकास मंत्रालय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दरवर्षी विविध स्पर्धाचे आयोजन करते. 2024 या वर्षाकरीता घेण्यात आलेल्या स्वच्छ व सुंदर शहर सर्वेक्षण स्पर्धेत मूल नगर परिषदेने जिल्हयात पहिला येण्याचा बहुमान मिळविला आहे. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या स्पर्धेत मूल शहर राज्यात 65 वा तर देशात 112 व्या स्थानावर आले असून ODF++ या प्रमाणपत्राचे मानकरी ठरले आहे. यापूर्वीही मूल नगर परिषदेला शहराच्या स्वच्छते सोबतचं सुंदर ठेवण्यासाठी केलेल्या विविध उपक्रमांकरीता राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहे. जिल्हयात अस्तित्वात असलेल्या विविध नगर परिषदांमधें मूल नगर परिषद माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभा क्षेत्रात येते. त्यामूळे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन आणि उपलब्ध होत असलेल्या शासकिय निधी मधून नगर प्रशासनाने स्वच्छ आणि सुंदर शहर ठेवण्यासाठी मूल शहरात विविध योजना सोबतचं सार्वजनिक शौचालयांची निर्मिती, घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडी द्वारा कचरा संकलन, स्वच्छतेसंबंधी जनजागृती आणि त्याकरीता नागरीकांचा सक्रिय सहभाग मिळविण्यात नगर प्रशासनातील तत्कालीन आणि विद्यमान मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी विशेष परिश्रम घेतलेे आहे. त्यांच्याच परिश्रमातून केंद्र सरकारने घेतलेल्या 2024 या वर्षीच्या स्वच्छ व सुंदर शहर स्पर्धेत मूल नगर परिषदेने जिल्हयात पहिला येण्याचा सन्मान मिळविल्याने समाधान व्यक्त केल्या जात आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्यें मूल नगर परिषदेला मिळालेल्या यशात नागरीकांसोबतचं नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामूळे मिळालेला पुरस्कार नागरीकांसह नगर परिषद कर्मचा-यांना बहाल करतो. मूल शहराला स्वच्छ व सुंदर निर्माण करण्यासाठी शहरातील सर्व घटकांनी सामुहिक प्रयत्न केले असून भविष्यात शहराचा मोठया प्रमाणात कायापालट होणार आहे. त्यामूळे नागरीकांनी कच-याचे विलीगीकरण करण्यासोबतचं स्वच्छतेसाठी सहकार्य करावे

संदीप दोडे, मुख्याधिकारी
नगर परिषद मूल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here