ग्राम पंचायतीच्या शिपाई पदाच्या निवड प्रक्रीयेत गैरप्रकार, अन्यायग्रस्त सहा परिक्षार्थ्यांनी केली तक्रार, सरपंच आणि ग्रामसेवकाने केला नियमानुसार भरतीचा दावा

0
41

मूल : तालुक्यातील ग्राम पंचायत चितेगांव येथे नियुक्त करावयाच्या शिपाई पदाच्या निवड प्रक्रियेत ग्राम पंचायतीच्या काही सदस्यांनी पदाचा गैरवापर करून मर्जीतल्या रोजगार सेवकास नियुक्त करण्यासंबंधी गैरप्रकार केला. त्यामूळे शिपाई पदाची परिक्षा पुन्हा घेण्यांत यावी. अशी मागणी अन्यायग्रस्त सहा उमेदवारांनी केली आहे.

तालुक्यातील ग्राम पंचायत चितेगांव येथे रिक्त असलेल्या शिपाई पदासाठी 9 एप्रिल 2025 रोजी लेखी परिक्षा घेण्यांत आली. अटी आणि शर्थीनुसार दिपक चौधरी, सुरज आभारे, विवेक उईके, तुलाराम आभारे, राकेश बारेकर, निखील देशमुख, राकेश पेंदोर, प्रशांत सोनपिंपळे आणि ओमेश नन्नावरे हे 9 उमेदवार परिक्षेकरीता पात्र झाल्याने जिल्हा परिषद शाळा चितेगांव येथे ग्राम पंचायतीच्या वतीने त्यांची लेखी परिक्षा घेण्यांचे ठरले. ग्राम पंचायत समितीच्या निर्देशानुसार ग्रामसेवक सारीका धात्रक यांनी लेखी परिक्षेकरीता 50 प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार केली. नियोजीत दिवशी 9 परिक्षार्थ्यांकरीता प्रश्नपत्रिकांचे बंद लिफाफे आणण्यांत येवून 9 परिक्षार्थ्यांना देण्यांत आले. त्यामूळे परिक्षा झाल्यानंतर ग्राम सेवक यांचेकडे 9 उत्तर पत्रिकांचे लिफाफे असावयास पाहिजे होते. परंतू त्यांचेकडे 9 परिक्षार्थ्यांशिवाय 1 बंद नसलेला असे 10 लिफाफे असल्याचे निदर्शनास आले. लिफाफे बंद असलेल्या सर्व उत्तर पत्रिका जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बटे यांनी परिक्षार्थ्यांसमक्ष तपासुन परिक्षेचा निकाल ग्राम सेवक यांचेकडे सुपूर्द केला. जाहीर केलेल्या निकालानुसार शिपाई पदाकरीता परिक्षा देणा-या 9 परिक्षार्थ्यांमध्यें ग्राम पंचायत चितेगांव येथे मागील तीन वर्षापासून रोजगार सेवक म्हणून सेवारत असलेले सुरज आभारे यांनी 76 गुण प्राप्त केले. उर्वरीत आठ जणांना 76 पेक्षा कमी गुण मिळाल्याचे दिसून आले. परिक्षा देणा-या 9 परिक्षार्थ्यामध्यें 1 परिक्षार्थी रोजगार सेवकाचा भाऊ असून दुसरा रोजगार सेवकाच्या घराबाजुला राहणार आहे. उर्वरीत सहा परिक्षार्थ्यामध्यें 3 पदवीधर असून स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे नियमित विद्यार्थी आहेत. असे असतांना पदवीधर नसलेल्या रोजगार सेवक असलेल्या परिक्षार्थ्याला तब्बल 76 गुण आणि पदवीधर तीन उमेदवारांशिवाय इतरांना 50 पेक्षा कमी गुण मिळावे. ही बाब आश्चर्यजनक असल्याचे मत तक्रारकर्त्या परिक्षार्थ्यांनी व्यक्त केले आहे. लेखी परिक्षेत 76 गुण प्राप्त करणारे सुरज आभारे हा रोजगार सेवक असल्याने ग्राम पंचायत पदाधिका-यांसोबतचं ग्रामसेवक यांचेही त्याचा नियमित संबंध येतो शिवाय त्यांना ग्राम पंचायत मधील अनेक कारभारांची इत्यंभुत माहिती आहे. त्यामूळे शिपाई पदाकरीता रोजगार सेवक सुरज आभारे हयाचीच निवड झाली पाहिजे हा उद्देश समोर ठेवून ग्राम पंचायत पदाधिका-यांनी ग्रामसेवक धात्रक यांचेशी सुत जुळवले. त्यांचे मार्फतीने परिक्षेची प्रश्नपत्रिका तयार करून रोजगार सेवकाला लेखी परिक्षेत सर्वाधिक गुण मिळविता यावे. या दृष्टीने परिक्षेच्या एक दिवसापूर्वी ती त्यांना उपलब्ध करून दिली. त्यामूळेच पदवीधर नसलेल्या रोजगार सेवक आभारे यांना 100 पैकी 76 गुण प्राप्त झाले. इतरांना मात्र 50 गुणांपेक्षा जास्त गुण मिळविता आले नाही. असा आरोप अन्यायग्रस्त परिक्षार्थ्यांनी केला असून ग्राम पंचायत मध्यें रिक्त असलेल्या शिपाई पदावर रोजगार सेवकाचीच नियुक्ती होणार असल्याची महिण्याभरापासून गावांतही चर्चा होती. असे मत व्यक्त केले. त्यामूळे घेण्यांत आलेली शिपाई पदाची परिक्षा रद्द करून ग्राम पंचायतीशी प्रत्यक्ष संपर्क नसलेल्या अधिका-या मार्फतीने पुन्हा परिक्षा घेण्यांत यावी. अशी मागणी केली आहे.
************

शिपाई पदाच्या लेखी परिक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही, तरीसुध्दा शिपाई पदाच्या नियुक्ती संबंधी लेखी तक्रार प्राप्त झाल्याने 22 एप्रिल रोजी होणा-या ग्राम पंचायतीच्या मासीक सभेत तक्रारीवर चर्चा करण्यांत येवून निर्णय घेण्यांत येईल.

कोमल रंदये, सरपंच
ग्राम पंचायत चितेगांव

***********

शिपाई पदाच्या लेखी परिक्षेकरीता पदाधिका-यांच्या निर्देशानुसार प्रश्नपत्रिकांचे 9 लिफाफे मी तयार केले. मुख्याध्यापक यांनी परिक्षा घेतली व परिक्षार्थ्यासमोरच उत्तरपत्रिका तपासली. त्यामूळे परिक्षेत पुर्णता पारदर्शीपणा व नियमांचे पालन करण्यांत आले. लेखी परिक्षेत नशीबामूळे अनेकदा हुशार विद्यार्थी मागे पडत असतात व गब्बु विद्यार्थी समोर जात असतात.

सारीका धात्रक, ग्रामसेवक
ग्राम पंचायत चितेगांव

——-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here