मूल : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्हयात दारूचा अवैद्य व्यवसाय करण्याचे उद्देशाने दारूची वाहतुक करीत असतांना मूल पोलीसांनी दारूसह 12 लाख 91 हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मूल येथील परीविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक प्रमोद चौगुले, पो.हवा.जमीरखान पठाण आणि नरेश कोडापे मूल गोंडपिपरी मार्गावरील नवेगांव भुजला ते बेंबाळ गांवादरम्यान एका शेताजवळ नाकाबंदी करून उभे असतांना संध्याकाळी 7 वाजताचे सुमारास गोंडपिपरी कडून खेडी कडे येत असलेल्या एमएच-34-सीडी-7116 क्रमांकाची ग्रे रंगाची सुझुकी इंडीका कारची तपासणी केली, तेव्हा सदर वाहणाच्या मागील सिट आणि मागील डिक्कीमध्यें ठेवलेल्या खोक्यांमध्यें विदेशी कंपनीची 2 लाख 91 हजार 540 रूपयाची दारू असल्याचे दिसून आली. यावरून पोलीसांनी सदर वाहणाचा चालक खुशाल भैयाजी बांगडे रा. नांदाफाटा ता.कोरपना जि. चंद्रपूर याला ताब्यात ठेवून अटक केली. सदर घटनेत पोलीसांनी 2 लाख 91 हजार 540 रूपयाच्या विदेशी दारूसह 10 लाख किंम्मतीचे वाहण जप्त केले. ताब्यात घेतलेल्या वाहण चालक खुशाल बांगडे यांना विचारणा केली, तेव्हा पोलीसांनी हस्तगत केलेली विदेशी दारू बल्लारशा येथील पवन जयस्वाल यांचेकडून सावली तालुक्यातील व्याहाड येथील निखील मंडलवार यांना पोहोचवून दिल्या जात असल्याचे सांगण्यांत आले. त्यामूळे वाहण चालकांच्या बयाणानुसार पोलीसांनी वाहण चालकासह पवन जयस्वाल आणि निखील मंडलवार यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पवन जयस्वाल आणि निखील मंडलवार यांचा पोलीस शोध घेत असून पुढील तपास पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांचे मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार तथा परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक प्रमोद चौगुले सहका-यांचे मदतीने करीत आहेत.












