मूल : येथील स्वामी विवेकानंद वॉर्ड क्र. १४ या परिसरात पावसामुळे खाली असलेल्या जागेत घरांच्या सभोवताल पाणी साचून परिसरात डासांचा प्रमाण वाढत चाललाय,अशातच काही घरांचा सांडपाणी निघण्याकरिता सध्या कच्या नाल्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये म्हशी बसतात. आणि लोकांच्या रहादारिमुळे तेथील पक्क्या नळीला जाणारा सांडपानी निघत नाही, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते, जवळच्या घरामध्ये जळू येतात, डासांचाही प्रमाण वाढलेला आहे आधीच डेंग्यूच्या रोग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे प्रसारमाध्यमातून सांगण्यात येत आहे.नगर परिषद आरोग्य विभागाला भ्रमणध्वनीवरून सूचना दिल्यानंतरही सदरच्या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समजते, घरांच्या बाजूने पाणी साचले असल्याने, शाळकरी मुलांना शाळेत सोडून देताना दोन महिला गाडी स्लीप होऊन पडन्याच्या घटना घडल्या ही बाब अत्यंत गंभीर आहे. डासांच्या वाढत्या प्रकोपामुळे परिसरात रोगांची लागण टाळता येत नाही, यावर नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष घालून सध्या नाल्यांचा सांडपाणी पक्क्या नाली मधून जाण्यास उपाय करणे, येथील नागरिकांच्या आरोग्याचा हिताचे होईल.












