मूल : दुचाकीने राईस मिल मध्ये कामाला जाण्यासाठी निघालेल्या युवकांचा परिवहन विभागाच्या बस पलटी झाल्याने करूण अंत झाल्याची घटना आज सोमवारी सकाळच्या सुमारास बोरचांदली नदीजवळ घडली घडली. संदीप रामदास कोकोडे वय 28 वर्षे, प्रफुल उर्फ भाऊराव गुरनुले वय 24 वर्षे असे मृत्तकाचे नांव आहे. मूल तालुक्यातील मौजा फिस्कुटी येथील संदीप रामदास कोकोडे वय 28 वर्षे, प्रफुल उर्फ भाऊराव गुरनुले वय 24 वर्षे हे एम एच 34 सी ए 3704 ने मूल येथील राईस मिल येथे जात असताना परिवहन विभागाच्या बस क्रं. एम एच 07 सी 9158 ही मूल वरून चामोर्शीला जात असताना नदीजवळ पलटी झाल्याने त्या बसखाली येथुन दोघेही ठार झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन शव उत्तरीय तपासणी करीता मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












