निवेदन देण्यासाठी गेलेल्या समितीच्या अध्यक्षाची भाऊने बिनपाण्याने भादरवली

0
53

मूल : शहरात चर्चेचा झालेला मूल-चंद्रपूर मार्गाचा चौपदरीकरणाचा विषयाचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या समितीच्या अध्यक्षाची भाऊंनी बिनपाण्याने भादरवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

तीन वर्षापुर्वी गाजलेला रेल्वे मालधक्याचा प्रश्न सोडविण्यात शहरवासीयांच्या सहकार्याने यशस्वी झालेल्या स्थानिक मार्निंग ग्रृपने अलीकडे मूल येथुन गेलेल्या महामार्गाचा विषय हाती घेतला आहे. राज्य मार्गाचे महामार्गात रूपांतर झाल्यानंतर शासनाने गडचिरोली ते चंद्रपूर पर्यंत महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेतले. सदर काम करतांना गडचिरोली पासुन मूल पर्यंत सिमेंटीकरणासोबत चौपदरीकरण केले. परंतु मूल ते चंद्रपूर पर्यंतच्या मार्गाचे सिमेंटीकरणासोबत चौपदरीकरण न करता जंगल आणि प्राण्यांचे कारण सांगून केवळ डांबरीकरण केले. डांबरीकरण केलेला सदर मार्ग सध्या खराब झाला असुन अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामूळे वाहण चालकांना ञास सहन करावा लागत आहे. मार्गावरील वाढती वाहतुक आणि जड वाहणांच्या संख्येमूळे सदर मार्गावरील डांबर उखडुन वर्षभरातच खड्डे पडतात. त्यामूळे दर दोन वर्षांनी सदर मार्गाच्या दुरूस्तीवर लाखो रूपये खर्च करण्याऐवजी शासनाने मूल पासुन चंद्रपूर पर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण करावे. या विधायक मागणीच्या पुर्ततेसाठी मार्निंग ग्रृपने अलीकडे मोहीम हाती घेतली आहे. मोहीमे अंतर्गत रस्ता चौपदरीकरण समिती निर्माण करून समितीच्या माध्यमातुन आमदार, खासदार आणि पालकमंञी यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार स्थानिक रहीवासी असलेल्या माजी मंञी शोभाताई फडणवीस यांची भेट घेवुन मार्गाच्या चौपदरीकरणात लक्ष देण्याची निवेदनव्दारे विनंती केली. त्यावेळेस माजी मंञी शोभाताई फडणवीस यांनी मागणीच्या अनुषंगाने प्रखर मत व्यक्त करत निवेदनकर्त्यांचे समाधान केले. दरम्यान मूल भेटीवर आलेले आमदार भाऊ यांनाही सदर मागणीचे निवेदन द्यावे. असे ठरवुन मार्निंग ग्रृप मधील काहीजण स्थानिक प्रशासकीय भवनात भाऊंच्या भेटीसाठी निवेदन घेवुन पोहोचले. जनतेच्या तक्रारी स्विकारत अधिकाऱ्यां समक्ष त्यांचे निराकरण करत असतांना भाऊ आपल्या अत्यंत जवळचे असा विश्वास बाळगत समितीचे अध्यक्ष सहका-यांसह भाऊसमोर पोहोचले. मागणीचे निवेदन समोर करताच समितीच्या अध्यक्षावर भाऊ भडकले. डबल गेम खेळतोस कां ? म्हणत यापुर्वी तुला एका प्रकरणातुन वाचविलो. आता लक्षात ठेवीन असे म्हणत यापुढे माझे कडे यायचे नाही, अशी तंबी देत अधिकारी, कर्मचारी आणि जनतेसमोर चांगलीच खरडपट्टी काढली. समितीच्या अध्यक्षाप्रती भाऊ संतप्त झाल्याचे दिसताच शिष्टमंडळातील अनेकांनी पाय काढत पोबारा केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपेक्षा नसतांना भाऊंकडुन अचानक सदर प्रकार घडल्याने समितीच्या अध्यक्षासह अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असुन सदर प्रकाराची शहरात चर्चा आहे.

मार्ग चौपदरीकरण या मथळ्याखाली व्हाँटसअँप ग्रृप तयार करण्यात आला असुन भाऊकडुन काढण्यात आलेल्या खरडपट्टीसह सध्या ह्या ग्रृपची शहरात जोरदार चर्चा आहे. ग्रृपमधील मँसेजकडे अनेकजन मनोरंजन म्हणुन बघत असुन मोजकी मंडळी चर्चेत सहभागी होतात. त्यामूळे सदर मागणी विषयी सामान्य जनतेत वेगळी चर्चा ऐंकायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here