मूल : थोरामोठयांची परंपरा लाभलेल्या काॅंग्रेस पक्षाला इतिहास असून त्यागाची भूमीका आहे, सत्तेच्या हव्यासापोटी स्वायत्त संस्थाच्या खांदयावर बंदुक ठेवून मतांची चोरी करून कारभार करणारी काॅंग्रेस नाही, याची आता मतदारांना जाणीव झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खरे-खोटे सिध्द होणार आहे, त्यामूळे काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यानी न डगमगता कामाला लागावे, असे आवाहन निरीक्षक उमाकांत अग्नीहोत्री यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्याशी चर्चा आणि पक्ष कार्याचा आढावा घेण्यासाठी स्थानिक काॅंग्रेस भवन येथे निरीक्षक म्हणून मार्गदर्शन करतांना उमाकांत अग्नीहोत्री बोलत होते. काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुभाष धोटे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा सभेला प्रदेश सरचिटणीस तथा जि.प.चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक विलास मोगरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार उपस्थित होते. मतांची चोरी करून नव्हे तर प्रामाणीकपणे प्रयत्न करून संतोषसिंह रावत यांनी विधानसभा निवडणुकीत 80 हजार मत घेतली, रावत यांचा पराभव झाला असला तरी त्या 80 हजार मतदारांचे रावत आमदार आहेत असे सांगतांना रावत यांच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. स्वतःला काॅंग्रेसचे निष्ठावंत म्हणवून मिरवणारी मंडळी निवडणुकीत विरोधकांशी हातमिळवणी करून काॅंग्रेसच्या विरोधात उघड प्रचार करतात त्यामूळे अश्या संधीसाधु नेत्यांपासून कार्यकर्त्यानी आणि नेत्यांनीही सावध राहावे. असे मत संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी कार्यकर्ते काॅंग्रेसची शक्ती असून या शक्तीने काॅंग्रेस नेेते राहुल गांधी यांच्या वोट चोर-गद्दी छोड या स्क्रीप्टचा प्रचार आणि प्रसार करून जनजागृती करावी. अशी विनंती करतांना मतांची चोरी करून भाजपा सत्तेवर आल्याचे सांगीतले. यावेळी सभापती राकेश रत्नावार यांनी मनोगत व्यक्त करतांना नेत्यांनी कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहावे. अशी विनंती केली. यावेळी तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले यांनी मूल तालुका, ओमेश्वर पद्मगीरीवार यांनी पोंभुर्णा आणि मूल शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी मूल शहराचा आढावा सादर केला. सभेचे संचलन सुरेश फुलझेले यांनी तर आभार घनश्याम येनुरकर यांनी मानले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती राजु कन्नमवार,पोंभुर्णा तालुकाध्यक्ष वासुदेव पाल, महिला तालुकाअध्यक्ष रूपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलीनी आडपवार, युवक अध्यक्ष पवन निलमवार आदिसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.












