मूल : मणुष्य जीवनात पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञानाची सुद्धा गरज असते. त्यामूळे उज्वल भारताचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारीक ज्ञानाच्या वाढीसाठीही प्रयत्न करावे. असे आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
स्थानिक कन्नमवार सभागृहात आयोजित करियर मार्गदर्शन आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते. आजचे यश हे उद्याच्या उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करणारे महत्वाचे पाऊल असुन मूल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर आकाशामध्ये यशाची उंच भरारी घेण्याची कामगिरी केली याचा आम्हाला अभिमान असुन मुल तालुक्याचा गौरव महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये पोहोचविण्याचे कार्य करा, अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी किर्तनकार व्याख्याते सोपान कनेरकर, भाजापाचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, राजेंद्र महाडोळे, माजी नगराध्यक्ष उषाताई शेंडे, रत्नमाला भोयर, नंदकिशोर रणदिवे, प्रवीण मोहुर्ले, प्रभाकर भोयर, चंदू मारगोनवार, अजय गोगुलवार,अनिल साखरकर, महेंद्र करकाडे, किशोर कापगते, सोहम बुटले, मिलिंद खोब्रागडे, राकेश ठाकरे आदींसह पुरस्कारप्राप्त विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रामाणपञ व सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान व्याख्याते सोपान कनेरकर यांनी विद्यार्थ्यांना भविष्याची वाटचाल या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन युवराज चावरे यांनी केले. सुखदेव चौथाले यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन महेंद्र करकाड़े यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय मारकवार, गुरुदेव बोदलकर, चेतन कवाडकर, आस्तिक मेश्राम, प्रमोद कोकुलवार आदींनी प्रयत्न केले












